Infinix ब्रँड नेहमीच हटके स्मार्टफोन सादर करण्याचं काम करतं. विशेष म्हणजे या डिवाइसची किंमत देखील परवडणारी असते. आता कंपनी इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला अँटीबॅक्टेरियल पॅनल असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन Infinix Smart 6 नावानं सादर केला जाईल, अशी माहिती Infinix India चे CEO, अनीश कपूर पाणी ट्विटरवरून दिली आहे.
एका संशोधनानुसार, एका स्मार्टफोनवर टॉयलेट सीटपेक्षा दहापट जास्त सूक्ष्मजंतू असतात. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन अनेक आजारांचं कारण बनू शकतो. हेच इनफिनिक्सनं हेरलं आहे आणि यावर उपाय सादर करण्याचं काम कंपनी करू शकते. Infinix India सीईओ, अनीश कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी स्मार्टफोन इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला फोन असेल जो अँटीबॅक्टेरियल पॅनलसह बाजारात येईल.
हा एक नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असेल त्यामुळे याची किंमत दहा हजार रुपयांच्या आसपास असू शकते. फोनच्या बॅक पॅनलवर सिल्व्हर ऑयन स्प्रे करण्यात येईल, ज्यामुळे हा अँटीबॅक्टेरियल बनेल. अनिश यांनी शेयर केलेल्या फोटोनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. तसेच मागे एक फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोन एप्रिलच्या अखेरीस सादर केला जाऊ शकतो. जागतिक बाजारात आलेल्या Infinix Smart 6 ची माहिती पुढे देण्यात आली आहे.
Infinix Smart 6 चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Smart 6 मध्ये 6.6-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 226PPI पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये UNISOC SC9863A प्रोसेसरवर चालतो, त्याचबरोबर 2GB RAM आणि 32GB स्टोरेजसह येतो. डिवाइस Android 11 Go Edition वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.08MP चा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा कॅमेरा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा एक ड्युअल सिम 4G फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 6 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ब्लॅक, ग्रीन, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.