Infinix भारतात आपला नवीन 5G Smartphone सादर करणार आहे. Infinix Zero 5G हा कंपनीचा पहिला 5G फोन असेल. हा फोन 8 फेब्रुवारीला देशात सादर केला जाईल, अशी माहिती टिपस्टर अभिषेक यादवनं दिली आहे. हा फोन 13 5जी बँड्ससह सादर करण्यात येईल. तसेच समोर आलेल्या टीजरमध्ये कंपनीनं थेट Realme 8s 5G स्मार्टफोनशी तुलना केली आहे. तसेच अन्य स्मार्टफोन कंपन्यांपेक्षा कोणते फीचर्स जास्त आहेत हे देखील दाखवलं आहे.
Infinix Zero 5G चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन आहे. हा डिस्प्ले बेजल लेस आणि पंच होल डिजाईनसह सादर करण्यात येईल. फोनच्या डावीकडे व्हॉल्युम बटन आणि उजवीकडे फिंगरप्रिंट व पॉवर बटन देण्यात आली आहे.
Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक Dimensity 900 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सोबत ग्राफिक्ससती Mali G68 GPU देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालेल. फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि टेलीफोटो लेन्स मिळू शकते. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी 33W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.
हे देखील वाचा: