आपल्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाणारी Infinix कंपनी गेल्या महिन्यात एका प्रीमियम स्मार्टफोनमुळे चर्चेत आली होती. कंपनीने आपला Infinix Concept Phone 2021 स्मार्टफोन जगासमोर ठेवला होता ज्यात 160W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा कॉन्सेप्ट फोन Zero सीरीजमध्ये लाँच केला जाईल, अशी चर्चा होती. साधारणतः असे कॉन्सेप्ट फोन बाजारात येत नाहीत. परंतु आता Infinix Zero X Neo नावाचा एक स्मार्टफोन Google Play Console वर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या आगामी इनफिनिक्स स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.
Infinix Zero X Neo स्मार्टफोन जूनमध्ये Bluetooth SIG वर देखील दिसला होता. गुगल प्ले लिस्टिंगमध्ये इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन मॉडेल नंबर X6810 दिसला आहे. या लिस्टिंगनुसार, Infinix Zero X Neo मध्ये मीडियाटेकचा Helio G90 चिपसेट देण्यात येईल. तसेच या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम दिला जाऊ शकतो आणि यापेक्षा जास्त रॅम व्हेरिएंटची शक्यता नाकारता येत नाही.
Infinix Zero X Neo स्पेसिफिकेशन्स
मलेशियन सर्टिफिकेशन साईटनुसार मॉडेल नंबर X6810 असलेला इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन Zero M नावाने सादर केला जाईल. या स्मार्टफोनमध्ये 480ppi पिक्सल डिनसिटीसह फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Geekbench लिस्टिंगमध्ये इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G95 चिपसेट, 8GB रॅम आणि अँड्रॉइड 11 OS दाखवण्यात आला आहे. दुसरीकडे गुगल प्ले लिस्टिंगवर इनफिनिक्सचा X6810 स्मार्टफोन Infinix Zero सीरीजमध्ये येईल, असे समजले आहे. कंपनी आपल्या झिरो सीरीजमध्ये Zero X आणि Zero X Pro देखील लाँच करणार आहे, अशी चर्चा आहे.