Infinix आपल्या नव्या बजेट स्मार्टफोनची तयारी करत आहे. हा फोन Infinix Zero X नावाने बाजारात दाखल होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी रेंडर्समधून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली होती. या स्मार्टफोनसह कंपनी अजून एक स्मार्टफोन सादर करू शकते. आता या सीरिजमधील दुसरा स्मार्टफोन Infinix Zero X Pro चा व्हिडीओ युट्युबवर लीक झाला आहे. Tech Arena24 नावाच्या युट्युब चॅनेलने Infinix Zero X Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे.
Infinix Zero X Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स
Infinix Zero X Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. युट्युबर नुसार या स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट सादर केले जातील. या इनफिनिक्स फोनमध्ये 8GB आणि 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.हा फोन Android 11 वर आधारित XOS 7.6 UI वर चालतो. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती युट्युबरने दिली नाही.
Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
कंपनी Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S वर देखील काम करत आहे. Google Play कंसोल लिस्टिंगनुसार, Infinix Hot 11 मध्ये वाटर-ड्रॉप नॉच असलेला फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी Infinix Hot 11 मध्ये Helio G70 चिपसेट मिळू शकतो. ज्याला 4GB रॅम आणि Android 11 ची जोड देण्यात येईल.
Infinix Hot 11S स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिजाईन देण्यात येईल. हा डिस्प्ले 1080×2460 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये Helio G88 SoC असल्याचे रिपोर्ट्समधून समजले होते. परंतु Google Play कंसोलवर हा फोन Helio G70 आणि 4GB रॅमसह लिस्ट झाला आहे. Hot 11S मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज 6GB रॅम देण्यात येईल, असे Infinix सांगितले होते.