Instagram Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अचानक ठप्प झाले (Instagram Down). जगभरातील करोडो युजर्सना इन्स्टाग्रामवर थेट मेसेज (DM) पाठवण्यात अडचणी येत आहेत. वेबसाइटच्या तांत्रिक समस्यांचा मागोवा घेणाऱ्या डाउनडिटेक्टरच्या (Downdetector) मते, ही समस्या संध्याकाळी 5:14 वाजता सुरू झाली. दरम्यान, ॲपमध्ये आलेल्या समस्येबद्दल Meta द्वारे कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.
इंस्टाग्रामवरील समस्येबाबत फेसबुक आणि एक्सवर अनेक युजर्स या समस्येबद्दल तक्रारी नोंदवत आहेत. अनेक युजर्सना तर ॲपमध्ये लॉग इन करण्यात आणि होम फीड रिफ्रेश करण्यातही समस्या येत आहेत.
अॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात समस्याॲपमधील समस्येमुळे अनेक यूजर्सना फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यात अडचणी येत आहेत. इन्स्टाग्रामच्या सेवांमध्ये या समस्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, इंस्टाग्रामचे जगभरात 20 कोटींहून अधिक डेली अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
भारतातदेखील या ॲपचे लाखो युजर्स आहेत. इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी बंद पडल्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ सुरू झाला. तसेच, या समस्येबाबत सोशल मीडियावर अनेकजण मजेशीर मीम्स शेअर करत आहेत.