इन्स्टाग्रामची सर्व्हिस अचानक ठप्प झाली आहे. अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याने युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान सोशल मीडिया आणि वेबसाइट्स इत्यादींना ट्रॅक करणारी वेबसाईट Downdetector वर अनेकांनी याबाबत रिपोर्ट केला आहे. ११.३० वाजल्यापासून इन्स्टाग्रामचा वापर करताना समस्या येत असल्याचं म्हटलं आहे.
Downdetector वर जवळपास एक हजार युजर्सनी त्यांना अडचण येत असल्याचं सांगितलं. काही मिनिटांत ही संख्या दोन हजारांवर पोहोचली. इन्स्टाग्राम डाउन संदर्भात अनेक लोकांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. ज्या आता व्हायरल होत आहेत.
इन्स्टाग्राम हा एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. अनेक युजर्स यावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. या प्लॅटफॉर्मवर इनस्टाग्राम रील्स देखील खूप लोकप्रिय आहे. त्यामुळेच तरुणाईमध्ये याची सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळते.
इन्स्टाग्राम आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांनी अद्याप या आउटेजबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. तथापि, याबद्दल काही मीम्स देखील सोशल मीडियावर येऊ लागले आहेत, जिथे लोकांनी या आउटेजबद्दल सांगितलं आहे.
अनेकांनी एक्स प्लॅटफॉर्मवर मोबाईलचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि Sorry, Something Went Wrong असा मेसेज येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच याशिवाय अनेकांनी काही फोटोही शेअर केले आहेत. येथे लोकांनी दाखवलं की, इन्स्टाग्राम डाउन झाल्यामुळे युजर्स ट्विटरकडे वळले आहेत.