सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram च्या यूजर्सना लॉगइन केल्यानंतर अचानकपणे त्यांचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले असल्याचा मेसेज दिसत आहे. एवढेच नाही, तर यूजर्स या अलर्टचे स्क्रीनशॉट्स देखील सोशल मीडियावर शेअर करत आहेत. शेअर करण्यात येत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये इंस्टाग्रामचा एक मेसेज दिसत आहे. यात 31 ऑक्टोबर 2022 रोजी आपले अकाउंड सस्पेंड करण्यात आले आहे, असे लिहिले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, दुपारी साधारणपणे 1 वाजता असा मेसेज काही यूजर्सना मिळायला सुरुवात झाली होती. हे पाहून अनेक यूजर्सना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अलर्टसोबत यूजर्सना सांगण्यात येत होते, की आपल्याजवळ केवळ 30 दिवस आहेत. यानंतर आपले अकाउंट सस्पेंड करण्यात येईल. महत्वाचे म्हणजे, हजारो युजर्सना हा मेसेज गेला आहे. काही यूजर्सना आपल्या अकाउंटमध्ये कसल्याही प्रकारी अॅक्टिव्हिटी होत नसल्याचेही दिसून आले. त्यांचे अकाउंट पूर्ण पणे फ्रीज झाले होते. जो मेसेज यूजर्सना मिळाला आहे, त्यात कम्युनिटी गाइडलाइंस फॉलो न केल्यामुले आपले अकाउंट सस्पेंड करण्यात येत आहे, असे म्हणण्यात आल्याचे समजते.
यातच, इन्स्टाग्राम अॅप डाऊन झाल्याची माहिती इन्स्टाग्रामने स्वतः आपल्या ट्वीटर अकाउंटवरून दिली आहे. संबंधित ट्विटमध्ये इन्स्टाग्रामने म्हटले आहे की, “तुमच्यापैकी काहींना इंस्टाग्राम वापरण्यास समस्या येत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही संबंधित समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. #instagramdown.”
यूजर्स ट्विटरवरून काढतायत भडास -अशा प्रकारची समस्या निर्माण झाल्याने इंस्टाग्राम यूजर्स संतप्त झाले असून ते आपला राग ट्विटर अकाउंट्सवरून व्यक्त करत आहेत. हजारो यूजर्स आपला राग ट्विटरवरून व्यक्त करत आहेत. याच प्रकारे व्हाट्सअॅप 2 तास बंद राहिल्यानंतरही यूजसनी आपला राग व्यक्त केला होता.