शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

इंस्टाग्राम वापरण्यासाठी द्यावे लागणार का महिन्याला 89 रुपये? मेटा कंपनी लवकरच घेणार निर्णय  

By सिद्धेश जाधव | Published: November 10, 2021 3:35 PM

Instagram Subscription: Instagram सब्सक्रिप्शन सर्विस लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. आपल्या आवडत्या कन्टेन्ट क्रिएटर्सचा खास कंटेंट बघण्यासाठी युजर्सना पैसे द्यावे लागू शकतात.  

Instagram Subscription: इंस्टाग्राम रिल्समुळे लोकप्रिय फोटो शेयरिंग ऍपला वेगळीच दिशा मिळाली आहे. इंस्टाग्रामने आता व्हिडीओवर लक्ष केंद्रित केले आहे. आता कंपनी एका नवीन सब्सक्रिप्शन फीचरवर काम करत आहे. या फीचर अंतगर्त कंटेन्ट अ‍ॅक्सेस करण्यासाठी युजर्सना दार महिन्याला 89 रुपये द्यावे लागतील. यामुळे इंस्टाग्राम क्रिएटर्स आणि इंफ्लुएन्सर्सना फायदा मिळेल, असे कंपनीने सांगितले आहे.  

टेक वेबसाईट टेक क्रंचने अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरच्या लिस्टिंगमध्ये इन अ‍ॅप परचेज विभागात इंस्टाग्राम सब्सक्रिप्शन कॅटेगरी तयार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. इथे या सब्सक्रिप्शनची किंमत दर महिन्याला 89 रुपये असल्याचे दिसत आहे. जेव्हा ही योजना अस्तित्वात येईल तेव्हा यात बदल होऊ शकतो.  

प्रसिद्ध टिपस्टर Aleesandro Paluzzi ने ट्विटरवरून देखील इंस्टाग्राम सब्सक्रिप्शनची माहिती दिली आहे. यासाठी इंस्टाग्रामवर क्रिएटर्सच्या प्रोफाइलवर सब्सक्राइब बटनची चाचणी केली जात आहे. हे फिचर रोल आऊट झाल्यावर तुमच्या आवडीच्या क्रिएटर्सचा खास वेगळा कंटेन्ट बघण्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. असे सब्सक्रिप्शन सुरु करणारा इंस्टाग्राम पहिलाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल. याआधी याच धर्तीवर युट्युबने मेम्बरशिप तर ट्विटरने Twitter Blue आणि Super Follow फिचर सादर केले आहे.  

इंस्टाग्रामवर 89 रुपयांचे सब्सक्रिप्शन घेतले, तर तुम्हाला एक बॅज मिळेल. हा बॅज तुमच्या किंवा मेसेज समोर दिसेल. त्यामुळे क्रिएटर्सना आपल्या पेड मेम्बर्सची माहिती मिळेल. तसेच कंटेन्ट क्रिएटर्स आपल्या सब्सक्रिप्शनचा दर स्वतः ठरवू शकतील. यात इंस्टाग्रामचा हिस्सा असेल कि नाही हे अजून समजले नाही.  

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामMetaमेटाtechnologyतंत्रज्ञान