टेक्नॉलॉजी समाजासाठी घातक आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. परंतु याच टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केल्यास तीचा खूप फायदा होऊ शकतो. याचंच एक उदाहरण म्हणजे इंस्टाग्रामचं ‘Amber Alert’ नावचं नवीन फिचर आहे. याच्या मदतीनं इंस्टाग्राम सरकारी संस्थांना हरवलेली लहान मुलं शोधण्यास मदत करेल. AMBER Alert चा फुल फॉर्म Americas Missing: Broadcast Emergency Response असा आहे.
Instagram करणार मदत
इंस्टाग्रामचे हेड एडम मोसेरी यांनी ट्विटरवरून अंबर अलर्टची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “या आठवड्यात आम्ही इंस्टाग्रामवर AMBER Alert घेऊन येत आहोत. याचा अर्थ असा की जर तुम्ही एखाद्या हरवलेल्या मुलाच्या आसपास असाल, तर तुम्हाला मुलाचा फोटो आणि माहिती देणारा एक अंबर अलर्ट दाखवला जाईल.
जर हा अलर्ट एखाद्या देशात लागू झाल्यास एका ठराविक ठिकाणच्या आसपास राहणाऱ्या इंस्टाग्राम युजर्सच्या न्यूज फीडमध्ये AMBER Alert पाठवला जाईल. या अलर्टमध्ये हरवलेल्या मुलाचा फोटो, ठिकाण आणि संबंधित माहिती मिळेल. युजर्स इंस्टाग्रामवर हा अलर्ट शेयर देखील करू शकतील. यामुळे हरवलेली लहान मुलं शोधण्यास मदत होईल.
अनेक देशांमध्ये मिळणार फिचर
मेटानं इंस्टाग्रामवर AMBER Alert फिचर देण्यासाठी अनेक देशांची मदत घेतली आहे. सध्या हे फिचर 25 देशांमध्ये उपलब्ध झालं आहे. हे फीचर अमेरिकेत नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेन (NCMEC), ब्रिटेनमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेन आणि नॅशनल क्राइम एजेंसी, मेक्सिकोमध्ये अटॉर्नी जनरल ऑफिस आणि आस्ट्रेलिया फेडरल पोलीस यांच्या मदतीनं तयार करण्यात आलं आहे.