Instagram वरील शॉर्ट व्हिडीओ सेगमेंट Reels वर आता 60 सेकंदांचे व्हिडीओ अपलोड करता येतील. कंपनीने हा निर्णय टिकटॉक आणि युट्युब शॉर्टला टक्कर देण्यासाठी घेतला आहे, अशी चर्चा आहे. रिल्सवर प्रमाणावर असे व्हिडीओज अपलोड केले जातात जे आधी टिकटॉकवर अपलोड केलेले असतात. परंतु आतापर्यंत फक्त 30 सेकंदाचे व्हिडीओ अपलोड करता येत असल्यामुळे कंटेंट क्रिएटर्सचे नुकसान होत होते. (Instagram Reels adds One minute video upload feature)
इंस्टाग्रामचा हा निर्णय टिकटॉक आणि युट्युब शॉर्टला आव्हान देण्यासाठी घेण्यात आला असावा, अशी चर्चा आहे. भारतासह काही निवडक देशांमध्ये उपलब्ध असलेल्या युट्युब शॉर्ट्समध्ये आधीपासूनच हे फिचर आहे. आता रिल्समध्ये देखील एक मिनिटाचे व्हिडीओ अपलोड करता येत असल्यामुळे क्रिएटर्स सहज एक व्हिडीओ या तिन्ही प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकतात.
टिकटॉकचे भारतात पुनरागमन...
काही दिवसांपूर्वी टिपस्टर मुकुल शर्माने ट्विट करून सांगितले होते कि, बाईटडान्सने 6 जुलैला “TickTock” नावासह टिकटॉकसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे. या ट्रेडमार्क संबंधित किंवा देशातील टिकटॉकच्या पुन्हा एंट्री करण्याच्या बातमीबाबत बाईटडान्सने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, अॅप पुन्हा भारतात लाँच करण्यासाठी कंपनी सरकारशी बोलणी करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यासाठी कंपनी नवीन आयटी नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.