Instagram आपल्या स्टोरीजमध्ये दोन मोठे बदल घेऊन येणार आहे. आता या अॅपमधून Swipe-Up link फिचर बंद करण्यात येणार आहे. या फिचरची जागा नवीन लिंक स्टीकर फिचरला देण्यात येईल. तसेच अजून एक फिचर येत आहे, ज्यात इन्स्टाग्राम युजर्स आता स्टोरीज लाईक करू शकतील. हे बदल 30 ऑगस्टनंतर अॅपमध्ये दिसू शकतात. (Instagram may introduce link sticker feature for more users in near future)
Instagram Link Sticker फिचर
आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त फॉलोवर्स असणाऱ्या अकॉउंटसना इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक शेयर करता येत होत्या. या Swipe-Up नावाच्या फीचरच्या माध्यमातून इंस्टाग्राम सेलिब्रिटी किंवा क्रियेटर्स अॅप बाहेरील वेबपेजवर फॉलोवर्सना डायरेक्ट करू शकत होते. आता हे फिचर अॅप मधून काढून टाकण्यात येणार आहे, 30 ऑगस्टपासून हा बदल लागू होईल, अशी माहिती TechCrunch ने दिली आहे.
Instagram वरील Swipe-Up link फीचरच्या जागी आता नवीन Link Sticker फीचर येणार आहे. जे युजर यादी swipe-up फीचर वापरत होते त्यांना हे नवीन फिचर सर्वप्रथम उपल्बध होईल. सध्या टेस्टिंगमध्ये असलेले हे फिचर पुढल्या महिन्यात सर्व पात्र अकॉउंटससाठी उपलब्ध होईल. तसेच हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करवून देण्यावर देखील इंस्टाग्राम काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु हा निर्णय अॅप सुरक्षितता, लिंकद्वारे होणाऱ्या खोट्या माहितीचा प्रसार, स्पॅमिंग इत्यादी घटक लक्षात ठेऊन घेतला जाईल.
इंस्टाग्राम स्टोरीज लाईक बटन
इंस्टाग्राम स्टोरीजसाठी देखील लाईक बटन सादर करणार आहे. सध्या युजर्स स्टोरीजवर रिअॅक्ट करू शकतात तसेच रिप्लाय देऊ शकतात. परंतु लवकरच इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लाईक बटन देखील दिसू शकते. पोस्ट करणाऱ्या युजरला किती लाईक्स मिळाल्या आहेत हे बघता येईल. हे फिचर अजून बीटा टेस्टर्ससाठी देखील उपलब्ध झाले नाही. परंतु प्रसिद्ध डेव्हलपर Alessandro Paluzzi यांनी प्लॅटफॉर्म लवकरच हे नवीन उपलब्ध होईल असे सांगितले आहे.