इंस्टाग्राम भारतात काही वेळासाठी ठप्प झालं होतं. अनेक भारतीय युझर्सना Instagram आउटेजचा सामना करावा लागला. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर त्यांची शाळाही घेतली. DownDetector आउटेजचा मागोवा घेणाऱ्या या साइटने देखील आउटेजची पुष्टी केली. तसंच युझर्सना लॉग इन करण्यास समस्या येत असल्याचंही सांगितलं. दरम्यान, अनेक युझर्सनं याबाबत ट्विटरवही तक्रार केली. परंतु मेटानं या आऊटएजबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही.
अॅप वापरण्यात येत असलेल्या समस्यांची तक्रार करण्यासाठी अनेक युझर्सनं आऊटएज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म डाऊनडेटेक्टरची मदत घेतली. दरम्यान, सर्व्हर एररमुळे मुख्यत्वे मोबाईल अॅपवर समस्या निर्माण झाली असून वेबसाईट योग्यरित्या चालत असल्याचंही सांगण्यात आलं. जवळपास ११ वाजल्यापासून आऊटएजची समस्या येत असल्याचं समोर आलं आहे.