नवी दिल्ली - सोशल मीडियात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणाऱ्या इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कारण कंपनी एक लोकप्रिय फीचर हटवले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून Following Tab हटवले आहे. त्यामुळे आता युजर्सना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अॅक्टिव्हीटीवर लक्ष ठेवता येणार नाही.
इन्स्टाग्रामचे प्रोडक्ट हेड विशाल शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून Following Tab हटवले आहे. हे युजर्सच्या अत्यंत आवडीचं फीचर होतं. Following Tab च्या मदतीने युजर्सना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या अॅक्टिव्हीटीवर लक्ष ठेवता येत होतं. मित्र कोणत्या पोस्ट लाईक्स करतात, फॉलो करतात किंवा कमेंट करतात हे समजण्यास यामुळे मदत होत होती. मात्र हे लोकप्रिय फीचर हटवण्यात आले आहे. Following Tab हे फीचर हटवल्यामुळे अनेक युजर्स नाराज झाले आहेत.
2011 मध्ये इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी या फीचरची सुरुवात केली. तर काही दिवसांपूर्वी कंपनीने ग्लोबली Restrict फीचर रोलआउट केलं आहे. युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे. एखाद्या पोस्टवर येणाऱ्या चुकीच्या कमेंट रोखण्यासाठी हे फीचर मदत करतं. Apple iPhone युजर्स आता इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचर यूज करू शकणार आहेत. इन्स्टाग्रामवर या फीचरची अनेक दिवसांपासून टेस्टिंग सुरू होती. त्यानंतर आता कंपनीने हे रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरातील आयफोन युजर्सना इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचरचा आनंद घेता येणार आहे. अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी आधीपासून इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचर उपलब्ध आहे.
Instagram स्टोरीसाठी गाणं वाजणार, नवे 'लिरिकल स्टीकर्स' येणार
इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टामध्ये असलेलं स्टोरी फीचर अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये सध्या एका नव्या फीचरची चाचणी करण्यात येत आहे. इन्स्टाच्या स्टोरीमध्ये स्टीकर्स अॅड केल्यानंतर बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. अॅपमध्ये लवकरच हे नवं फीचर येण्याची शक्यता आहे.
Instagram वर कमी लाईक्स येतात? नवं फीचर करेल मदतइन्स्टावर आपल्या पोस्टना अथवा फोटोला किती लाईक मिळतात हे युजर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र काही जणांच्या पोस्टला खूपच कमी लाईक्स मिळतात. अशा इन्स्टाग्राम युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण इन्स्टाग्राम लाईक्स लपवण्यासाठी एका नव्या फीचरवर सध्या काम करत आहे. टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, युजर्समध्ये अनेकदा लाईक्सवरून स्पर्धा सुरू असते. ही स्पर्धा कमी करण्यासाठी इन्स्टाग्रामने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अनेकदा आपल्या प्रतिस्पर्धी युजर्सचे लाईक अधिक असल्यास त्याच्याबाबत द्वेष निर्माण होतो. तर काही जण कमी लाईक्स मिळतील म्हणून पोस्ट न करण्याचा विचार करतात. त्यामुळे या नव्या फीचरचा सर्व युजर्सना फायदा होणार आहे. युजर्स मनात कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता यामुळे बिनधास्त पोस्ट करू शकतात. इन्स्टाग्रामच्या प्रवक्यांनी रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम अशाप्रकारचं फीचर आणण्यासाठी विचार करत होतं. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.