इंटेक्स कंपनीने आपला अॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच केला आहे. इंटेक्स अॅक्वा लायन्स २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वॉड-कोअर प्रोसेसरने युक्त असणारा हा स्मार्टफोन १ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या सुविधेसोबत ग्राहकांना मिळणार आहे. यातील स्टोअरेज हे मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ६४ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. अँड्रॉईडच्या ७.० नोगट प्रणालीवर चालणारा हा स्मार्टफोन २,४०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. यात अनुक्रमे ५ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतेचे मुख्य आणि समोरचे कॅमेरे देण्यात आले आहेत.
इंटेक्स अॅक्वा लायन थ्री-जी स्मार्टफोनमध्ये ड्युअल सीम, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, जी-सेन्सर, ब्ल्यु-टुथ, मायक्रो-युएसबी पोर्ट आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. तर यात झेंडर आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओ हे अॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. यात डाटाबॅक हे अॅपही देण्यात आले असून याच्या माध्यमातून महिन्याला ५०० मेगाबाईट इतका डाटा ग्राहकाला वापरता येणार आहे. हा स्मार्टफोन सध्या ऑफलाईन पध्दतीने देशभरातील शाॅपीजमधून उपलब्ध करण्यात आला असून लवकरच ऑनलाईन शॉपींग पोर्टल्सवरूनही मिळणार असल्याचे इंटेक्स कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.