भारतातील प्रमुख ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या सिझनल सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये अनेक गॅजेट्स आणि स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट दिला जात आहे. विशेष म्हणजे आयफोन्सवर देखील मोठा डिस्काउंट मिळत आहे. खासकरून iPhone 12 आणि iPhone 12 Mini दोघांच्या किंमतीवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. या स्मार्टफोन्ससहा Flipkart iPhone XR आणि iPhone SE वर देखील डिस्काउंट देत आहे. तर Amazon वर iPhone 11 स्वस्तात मिळत आहे. (Flipkart and Amazon is offering biggest discount on last year iPhone models)
लोकप्रिय iPhone मॉडेल्सवरील डील्स
iPhone 12
जर तुम्ही iPhone 12 विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही सुवर्णसंधी आहे. या फोनचा 64GB व्हेरिएंट 67,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल तर 128GB व्हेरिएंट 72,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. HDFC बँकेच्या कार्डने iPhone 12 ची किंमत अजून कमी होऊ शकते.
iPhone 12 Mini
iPhone 12 Mini चा सर्वात छोटा व्हेरिएंट 57,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, हा व्हेरिएंट 64GB स्टोरेजसह येतो. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे, जो A14 बायोनिक चिपला सपोर्ट करतो. या फोनचा 128GB व्हेरिएंट डिस्काउंटनंतर 62,999 रुपये तर 256GB स्टोरेज व्हेरिएंट 72,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
iPhone 11
जुना iPhone 11 सध्या अॅमेझॉनवर 47,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ही या फोनच्या 64GB व्हेरिएंटची किंमत आहे. या फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट डिस्काउंटसह 52,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. iPhone 11 मध्ये एयरटॅगसाठी UWB चिप आणि A13 बायोनिक चिप मिळते.
iPhone XR
फ्लिपकार्टवर iPhone XR चा 64GB स्टोरेज व्हेरिएंट 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुम्हाला या आयफोन्ससोबत बॉक्समध्ये चार्जर देखील मिळू शकतो. या फोनचा 128GB व्हेरिएंट 42,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.
iPhone SE
iPhone SE हा गेल्यावर्षी लाँच झालेला सर्वात स्वस्त आयफोन आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या 64GB मॉडेलची किंमत 28,999 रुपयांपासून सुरु होत आहे. तर 128GB व्हेरिएंट 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. iPhone SE मध्ये जुना होम बटन आणि टच आयडी असे फीचर्स मिळतात.