Apple नेहमीच आपल्या प्रेझेन्टेशनमध्ये आयफोनच्या कॅमेरा क्वॉलिटीचा उल्लेख करते. अनेक आयफोन युजर्स देखील कॅमेरा आणि व्हिडीओ क्वॉलिटीसाठी आयफोनची निवड करतात. गेल्यावर्षी आलेला iPhone 13 देखील जबरदस्त कॅमेरा सेन्सर्ससह बाजारात आला होता. परंतु आता या फोनला कॅमेरा क्वॉलिटीमध्ये एका अँड्रॉइड स्मार्टफोन कडून हार पत्करावी लागली आहे.
DxOMark च्या परीक्षणांमध्ये Vivo X70 Pro स्मार्टफोननं iPhone 13 ला मागे टाकलं आहे. DxOMark ही एक स्मार्टफोन, कॅमेरा आणि लेन्सेसचं परीक्षण करते. या परीक्षणात विवोच्या स्मार्टफोनने आयफोनपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे Vivo X70 Pro ची किंमत iPhone 13 पेक्षा कितीतरी कमी आहे.
iPhone 13 मध्ये खूप चांगले कॅमेरा सेन्सर्स आहेत परंतु सायन्टिफिकली अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन्सनी त्याला मागे टाकले आहे. DxOMark वर सध्या अशा अनेक स्मार्टफोन्सची यादी उपलब्ध आहे ज्यांनी iPhone 13 ला मात दिली आहे. यात आता Vivo X70 Pro चा समावेश झाला आहे. जो Vivo चा हाय एन्ड स्मार्टफोन आहे आणि भारतात याची किंमत iPhone 13 पेक्षा जवळपास अर्धी आहे.
Vivo X70 Pro स्मार्टफोननं DxOMark च्या टेस्टमध्ये 131 पॉईंट्स मिळवले आहेत, जे जुन्या Vivo X50 Pro+ पेक्षा जास्त आहेत. हे पॉईंट्स iPhone 13 आणि iPhone 13 Mini पेक्षा जास्त आहेत. विशेष म्हणजे X70 Pro ने जुन्या iPhone 12 आणि iPhone 12 Mini ला देखील पछाडले आहे, ज्यांची किंमतही Vivo X70 Pro पेक्षा कितीतरी जास्त आहे. परंतु DxOMark च्या संपूर्ण यादीत मात्र हा फोन 12 स्थानावर आहे.
हे देखील वाचा:
नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड
Realme चा Pro लेव्हल 5G Phone येतोय बाजारात; लाँच पूर्वीच पाहा डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स