अॅप्पलने 14 सप्टेंबरला नवीन आयफोन 13 लाइनअपची घोषणा केली आहे. आता हे फोन्स खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. कंपनीने आता पुढील वर्षीच्या आयफोन्सवर काम करायला सुरुवात केली आहे, असे दिसत आहे. कारण सीरिज 13 च्या लाँचच्या आधीपासून iPhone 14 चे लीक येण्यास सुरुवात झाली होती. आता अॅप्पल अनॅलिस्ट मिंग-ची कुओ यांनी आगामी आयफोन्ससंबंधित माहिती लीक केली आहे. समोर आलेल्या लिक्समधून iPhone 14 मध्ये अँड्रॉइडमध्ये गेले कित्येक वर्ष उपलब्ध असलेले फीचर्स आणि स्पेक्स दिले जाऊ शकतात, असे वाटत आहे.
iPhone 14 Pro, Pro Max डिजाईन
कुओ यांच्या मते, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये नॉचच्या एक पंच-होल दिला जाईल. विशेष म्हणजे सध्या अँड्रॉइड डिवाइसेजमध्ये दिसणारी ही डिजाईन फक्त आगामी प्रो मॉडेल्समध्ये मिळेल. याआधी Jon Prosser यांनी देखील iPhone 14 Pro मध्ये नॉचच्या ऐवजी पंच-होल डिस्प्ले मिळेल हे सांगितले होते. नवीन सीरीजची डिजाईन मोठ्याप्रमाणावर iPhone 4 सारखी आहे. डिवाइसमध्ये शार्प कार्नर आणि गोल वॉल्यूम बटण मिळतील. तसेच आगामी आयफोन लाइनअपमध्ये कॅमेरा सेटअप बॉडीच्या आत असेल त्यामुळे डिवाइसची जाडी वाढून मोठी बॅटरी देखील दिली जाऊ शकते.
iPhone 14 कॅमेरा
iPhone 14 Pro मधील सर्वात मोठा बदल म्हणजे या फोनमध्ये मिळणार कॅमेरा असेल. कुओ यांनी दिलेल्या माहितीनुसार या फोनच्या बॅक पॅनलवर 48MP चा वाईड कॅमेरा मिळेल. आतापर्यंत आयफोनमध्ये 12MP पेक्षा जास्त रिजोल्यूशनचा कॅमेरा देण्यात आलेला नाही. तसेच पुढील वर्षी लाँच होणाऱ्या आयफोन सीरीजमध्ये अंडर-डिस्प्ले Touch ID मिळेल. एकीकडे 48MP कॅमेरा बजेट सेगमेंटमधील अँड्रॉइड फोन्समध्ये दिसतो तर मिडरेंज अँड्रॉइड इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येऊ लागले आहेत.