तब्बल एक कोटी रुपयांचा आयफोन लाँच झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या आयफोनच्या बॅक पॅनलवर रोलेक्स घड्याळ देखील आहे. हा कोणताही साधासुधा आयफोन नाही, जो तुम्ही एखाद्या ॲपलच्या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकाल. लक्झरी ब्रँड Caviar ने Apple च्या नव्या iPhone 14 Pro चे लिमिटेड एडिशन कस्टमाईझ केले आहे. आयफोनचे हे लक्झरी व्हर्जन खास हिरे आणि मेटल्सबासून बनवण्यात आले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे याच्या मागील पॅनलमध्ये रोलेक्स घड्याळ देखील आहे. याशिवाय रेस कारच्या कंट्रोल पॅनलसारखे डेकोरेटिव्ह सेन्सरही यामध्ये देण्यात आले आहेत. या आयफोनची किंमत 133,670 डॉलर्स (सुमारे 1.1 कोटी रुपये) आहे.
फोनच्या मागील बाजूला Rolex Daytona हे घड्याळ लावण्यात आले आहे. डेटोना कॅविअरच्या अपडेटेड कलेक्शन Grand Complications चा हिस्सा आहे. डेटोना रेसिंगसाठी डेडिकेटेड आहे आणि याला व्यावसायिक ड्रायव्हर्ससाठी डिझाईन करण्यात आल्याची माहिती कंपनीनं आपल्या वेबसाईटवर दिली आहे.
आयफोन 14 प्रो ची केस मल्टी बॉडी टायटॅनियमनं बनली आहे. याशिवाय त्यावर पीव्हीडी कोटींगही करण्यात आलंय. याचा वापर रोलेक्स ब्लॅक डायल, केसेस आणि ब्रेसलेट तयार करण्यासाठी करते. लिमिटेड एडिशन आयफोन 12 प्रो च्या बॅक पॅनलवर सोन्यानं तयार केलेल्या स्पीडोमीटर आणि स्विचचा वापर करण्यात आला आहे. या फोनचा रिअर लूक जबरदस्त आहे.
गेल्या वर्षी आला होता iPhone 13गेल्या वर्षी या लक्झरी ब्रँडने iPhone 13 आणि iPhone 13 Pro Max स्पेशल एडिशन लाँच केले होते. ब्रँडने आपल्या लाईनअपला "Parade of the Planets” असं नाव दिलं आहे. प्रोटोटाईप ब्लॅक टायटॅनिअमनं कव्हर करण्यात आले होते. हे रस्ट प्रुफ मटेरिअल जास्त करून स्पेस इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येतं.