Apple iPhone 15 Problems and Issues: अॅपल ने काही दिवसांपूर्वीच आपल्या नवी आयफोन सिरिज iPhone 15 लॉन्च केली. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कंपनीने एकूण चार मॉडेल्स सादर केले आहेत. त्यांची नावे iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max अशी आहेत. बर्याच लोकांनी 15 प्रो सीरीजबद्दल तक्रार केली आहे. त्यात ओव्हरहिटिंग, कॅमेराबाबतच्या तक्रारी, स्क्रॅच येणे, खराब बांधणी गुणवत्ता (बिल्ड क्वालिटी) याबद्दलच्या तक्रारींचा समावेश आहे.
ट्विटर प्लॅटफॉर्मवर अनेक लोकांनी iPhone 15 Pro आणि 15 Pro Max बद्दल तक्रार केली आहे. याशिवाय, त्या लोकांनी फोटो देखील पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये अॅपलची गुणवत्ता खराब असल्याचे दिसून आले आहे. अनेक ट्विट आहेत अशी आहेत ज्यात युजर्सने ओव्हरहिटिंगची तक्रार केली आहे. याशिवाय अनेक वापरकर्त्यांनी कॅमेरा अलाइनमेंटबद्दल तक्रार केली आहे, ज्यामुळे कॅमेरा लेन्स आणि कॅमेरा कव्हर विचित्र दिसत आहे.
अनेक युजर्सकडून स्क्रॅचच्या तक्रारी- वापरकर्त्यांनी आयफोन 15 मालिकेच्या मॉडेलच्या बॉडीवर अनेक स्क्रॅचेस पाहिले आहेत. हे स्क्रॅच दाखवण्यासाठी यूजर्सनी त्यांचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांनी कॅमेरा लेन्समध्ये त्रुटीदेखील दर्शविली आहे. वापरकर्त्यांनी सांगितले की हा हँडसेट अनेक ठिकाणी खराब झाला आहे.
कॅमेरा लेन्समध्ये चूक, फोनवर फिंगरप्रिंटच्या खुणा- एका वापरकर्त्याने पोस्ट केले आणि सांगितले की आयफोन 15 सिरिजमध्ये काही फोन्सवर फिंगरप्रिंटच्या खुणा उमटतात, तर iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर कोणत्याही खुणा उमटत नाहीत.
--
आयफोन 15 प्रो मॉडेल्समध्ये टायटॅनियम- Apple ने आयफोन 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्स या वर्षी टायटॅनियमवरून लॉन्च केले आहेत. कंपनीचा दावा आहे की टायटॅनियममुळे आयफोन 15 प्रो सीरीज पूर्वीपेक्षा हलकी आहे. यापूर्वी कंपनीने iPhone 14 मॉडेलमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर केला होता.