जर तुम्ही फोन रात्रभर चार्ज करत असाल जेणेकरून फोन सकाळी पूर्ण चार्ज होईल, तर Apple ने iPhone युजर्ससाठी एक इशारा दिला आहे. लोकप्रिय फोन निर्माता कंपनीने ही चूक घातक असल्याचं म्हटलं आहे. लोकांना फोन चार्ज करण्यासाठी रात्र ही सर्वोत्तम वेळ वाटते, कारण तुम्ही तेव्हा फोन वापरत नाही आणि सकाळी उठल्याबरोबर कामावर जावं लागतं.
रात्री फोन चार्जिंगवर ठेवून झोपणं चुकीचे मानले जाते. Apple इशारा देतं की, तुमचा iPhone चार्ज होत असताना तुम्ही कधीही त्याच्यासोबत झोपू नका, कारण यामुळे आग, इलेक्ट्रिक शॉक, दुखापत किंवा iPhone किंवा इतर मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं
उशीखाली ठेवू नका फोन
जर फोन चार्ज करताना नीट हवा मिळत नसेल तर धोका निर्माण होऊ शकतो. बहुतेक लोक फोन चार्जिंगला लावून उशीजवळ ठेवतात. यामुळे ओव्हरहिटिंग होऊ शकतं. याने फोनचं नुकसान तर होईलच पण आग लागण्याचीही शक्यता आहे.
फोन चार्ज करताना मिळायला हवी हवा
ऑफिशियल सेफ्टी मेमोमध्ये Appleने म्हटलं आहे की, 'डिव्हाइस, पॉवर एडॉप्टर किंवा वायरलेस चार्जरवर झोपू नका किंवा ते पॉवर स्त्रोताशी जोडलेले असताना ते ब्लँकेट, उशी किंवा तुमच्या शरीराखाली ठेवू नका. तुम्ही तुमचा आयफोन वापरत असताना किंवा चार्ज करत असताना, पॉवर एडॉप्टर आणि कोणतेही वायरलेस चार्जर हवेशीर क्षेत्रात ठेवण्याची खात्री करा.
Apple इशारा देतं की तुम्ही तुमचं डिव्हाइस चार्ज करण्यासाठी थर्ड-पार्टी चार्जर वापरता तेव्हा आग लागण्याचा, स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो, कारण काही कमी किमतीचे चार्जर अधिकृत Apple उत्पादनांसारखे सुरक्षित असू शकत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.