मुंबई : जर तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. इ-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सध्या अॅपल फेस्ट सुरू आहे. यामध्ये iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone 7 Plus आणि iPhone SE सह अनेक मॉडेल्सवर शानदार ऑफर्स मिळत आहेत. 9 डिसेंबरपर्यंत हा फेस्ट सुरू राहणार असून यामध्ये डिस्काउंट ऑफर्ससोबतच एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय या ऑफरही आहेत. शिवाय एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडिट कार्डने iPhone खरेदी केल्यास 2 हजार रूपयांचं इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.
- आयफोन 8 प्लसच्या 64 जीबी व्हेरिअंटवर 3,315 रुपयांची सूट मिळत आहे, त्यामुळे हा फोन येथे 69 हजार 685 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
- आयफोन 8 च्या 64 जीबी मॉडेलवर 4,610 रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. हा फोन 59 हजार 390 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
- आयफोन 7 च्या 32 जीबी व्हेरिअंटवर 7000 रुपयांचं डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा फोन 41,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
- आयफोन 7 प्लसवर 4,001 रुपयांची सूट मिळत असून, हा फोन 54,999 रुपयांमध्ये येथे उपलब्ध आहे.
- 3,001 रुपयांच्या डिस्काउंटसह iPhone 6S तुम्ही येथे 36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.
- iPhone 6 वर 3,510 रुपयांचं डिस्काउंट मिळत असून हा फोन येथे 25,990 रुपयांना उपलब्ध आहे.
- 6000 रुपयांच्या डिस्काउंटसह iPhone SE तुम्हाला 20 हजार रूपयांत खरेदी करता येऊ शकतो.