iPhone Safety Feature : Apple ने यावर्षी आपली रिपेअर पॉलिसी अपडेट केली आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या खराब झालेल्या iPhone साठी ओरिजिनल पार्ट्स मिळतील. या बदलांसोबतच कंपनीने एक नवीन फीचरही आणले आहे. हे फीचर Activation Lock or iPhone parts या नावाने ओळखले जाते. हे फीचर आता iOS 18 वर उपलब्ध आहे. आयफोन कंपोनेंट्स, जसे की बॅटरी, कॅमेरा आणि डिस्प्ले यांना नंबरद्वारे वैयक्तिक अॅपल अकाउंटशी जोडून सुरक्षा वाढवली जाणार आहे.
iPhone पार्ट्ससाठी नवीन सुरक्षा उपायएका रिपोर्टनुसार, डेव्हलपर आणि पब्लिक बीटा टेस्टर्ससाठी Apple ने iPhone पार्ट्ससाठी अॅक्टिव्हेशन लॉक लागू केले आहे. पूर्वी ॲक्टिव्हेशन लॉकचा वापर संपूर्ण डिव्हाइस सुरक्षित करण्यासाठी केला जात होता, परंतु या अपडेटमध्ये आता कंपोनेंट्स सुरक्षित केले जाणार आहेत. चोरीला गेलेल्या आयफोन पार्ट्सची बाजारपेठ कमी करणे, हा याचा हेतू आहे. यामुळे चोरीला गेलेल्या आयफोन्सच्या पार्ट्सच्या विक्रीवर आळा बसेल.
जुने कंपोनेंट्स अनलॉक करण्यासाठी आणि व्हेरिफाय करण्यासाठी सिस्टमला Apple अकाउंट पासवर्ड आवश्यक आहे. चोरीवर आळा घालण्यासाठी कंपनीच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या फीचरमुळे चोरी केलेले पार्ट्स पुन्हा कधीच सुरू केले जाऊ शकणार नाहीत. दरम्यान, iOS 18 चे पब्लिक रिलीज सोमवार, 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. हे अपडेट iPhone XR आणि नंतरच्या मॉडेल्ससाठी उपलब्ध असेल. सध्या हे ॲक्टिव्हेशन लॉक फीचर फक्त iPhones वर लागू होईल.