मुंबई: भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित 'आयफोन X' स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सध्या या स्मार्टफोनची भरमसाठ किंमत असून देखील जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली होती, त्यांनाच हा फोन मिळतोय. दरम्यान, या स्मार्टफोनचे अनेक ड्रॉप टेस्ट समोर आले आहे. यातीलच एक टेस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओ unlockriver.com ने आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. यामध्ये 'आयफोन X' स्मार्टफोन जवळजवळ 1000 फूट उंचीवरुन फेकण्यात आला आहे. unlockriver.com ने अपलोड केलेल्या या 'आयफोन X' च्या व्हिडिओला एक्स्ट्रीम ड्रॉप टेस्ट असे नाव दिले आहे. व्हिडिओमध्ये नवीन 'आयफोन X' स्मार्टफोनला एका दोरीने ड्रोनला बांधण्यात आले आहे. त्यानंतर ड्रोन जवळपास 1000 फूट उंचीवर नेऊन स्मार्टफोनला खाली असलेल्या सिमेंटच्या फरशीवर फेकण्यात आले. खाली फरशीवर पडल्यानंतर 'आयफोन X' स्मार्टफोनची मागील बाजू फुटली. मात्र, या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला काहीही धक्का लागला नाही. त्यानंतर या स्मार्टफोनला ऑपरेट करुन पाहिले असता, स्मार्टफोनमधील कॅमेरा सुरु होता आणि इतर फीचर्स सुद्धा व्यवस्थित ऑपरेट होत होते.
1000 फूट उंचावरुन फेकला iPhone X आणि पाहा काय झालं ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 6:53 PM
मुंबई: भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित 'आयफोन X' स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सध्या या स्मार्टफोनची भरमसाठ किंमत असून देखील जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली होती, त्यांनाच हा फोन मिळतोय. दरम्यान, या स्मार्टफोनचे अनेक ड्रॉप टेस्ट समोर आले आहे. यातीलच एक टेस्ट करण्यात ...
ठळक मुद्दे 'आयफोन X' स्मार्टफोन 1000 फूट उंचीवरुन फेकण्यात आलाव्हिडिओला एक्स्ट्रीम ड्रॉप टेस्ट असे नावस्मार्टफोनच्या डिस्प्लेला काहीही धक्का नाही