काही दिवसांपूर्वी चिनी ब्रँड आयक्यूने आपली iQOO 8 सीरीज चीनमध्ये लाँच केली होती. हा फ्लॅगशिप सीरिजमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. त्यामुळे या सीरिजच्या भारतीय लाँचची वाट आयक्यूचे चाहते बघत आहेत. कंपनीने या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु टिप्सटर देब्यान रॉयने सांगितले आहे कि पुढल्या महिन्यात ही सीरिज भारतात सादर केली जाईल.
iQOO 8 इंडिया लाँच
देब्यान रॉयने सांगितले आहे कि, पुढल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये iQOO 8 सीरिज भारतात सादर केली जाईल. या सीरिजमधील दोन्ही स्मार्टफोन बाजारात येतील कि नाही याची मात्र अजून पुष्टी झाली नाही. विशेष म्हणजे चीनमध्ये लाँच होण्याआधी iQOO 8 ब्रँड अंतगर्त रजिस्टर्ड एक डिवाइस I2019 मॉडेल नंबरसह IMEI के डेटाबेसमध्ये दिसला होता. हा स्मार्टफोन iQOO 8 चा भारतीय व्हेरिएंट आहे, असे सांगण्यात आले होते.
iQOO 8 चे स्पेसिफिकेशन्स
आयक्यू 8 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. 19.8:9 अस्पेक्ट रेशियोसह येणारा हा डिस्प्ले 2376×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप 888 चिपसेट देण्यात आणि एड्रेनो 660 जीपीयू देण्यात आला आहे. या आयक्यू फोनमध्ये 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256 पर्यंतची वेगवान UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित ओरिजनओएसवर चालतो. हे देखील वाचा: 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s भारतात लाँच; जाणून घ्या शानदार स्मार्टफोनची किंमत
आयक्यू 8 मधील फोटोग्राफी सेगमेंट देखील तितकाच खास आहे. यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य Sony IMX598 सेन्सर गिंबल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. त्याचबरोबे 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.
iQOO 8 मध्ये सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या ड्युअल सिम फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटीसह 5G SA/NSA आणि Dual 4G VoLTE सपोर्ट देण्यात आला आहे. आयक्यू 8 मधील 4,350एमएएचची बॅटरी 120वॉट अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. ही टेक्नॉलॉजी काही मिनिटांत हा स्मार्टफोन फुल चार्ज करू शकते. हे देखील वाचा: स्वस्तात मस्त Realme C21Y भारतात लाँच; कमी किंमत मिळणार 5,000mAh बॅटरी आणि 4GB रॅम
iQOO 8 ची किंमत
आयक्यू 8 चे दोन व्हेरिएंट चिनी बाजारात दाखल झाले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB storage असलेला व्हेरिएंट 3799 युआन (अंदाजे 43,500 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. तर 12GB RAM आणि 256GB storage व्हेरिएंट 4199 युआन (अंदाजे 48,00 रुपये) मध्ये विकत घेता येईल.