कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देणाऱ्या ब्रॅंड्सच्या यादीत iQOO चा समावेश होत आहे. आयकू चीन पाठोपाठ भारतीय बाजारात देखील आपले अस्तित्व दाखवून देत आहे. आता कंपनीने आपली नवीन फ्लॅगशिप चीनमध्ये सादर केली आहे आणि ही सीरिज लवकरच भारतात देखील दाखल होऊ शकते. कंपनीने चीनमध्ये आपल्या नवीन ‘आयकू 8’ सीरीज अंतर्गत iQOO 8 आणि iQOO 8 Pro नावाचे दोन दमदार स्मार्टफोन लाँच केले आहेत. यातील शक्तिशाली आयकू 8 प्रो ची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत.
iQOO 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स
आयकू 8 प्रो मध्ये कंपनीने 6.78 इंचाचा क्वॉड एचडी+ Samsung E5 AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले :9 अस्पेक्ट रेशियो, 120Hzरिफ्रेश रेट, HDR10+, Dolby Vision, 1.07 billion colors आणि DCI-P3 color gamut अश्या भन्नाट फीचर्सना सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉम अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर सिक्योरिटीसाठी केला आहे.
इतर स्पेक्सप्रमाणे आयकू 8 प्रो स्मार्टफोनचा परफॉर्मन्स सेगमेंट देखील जबरदस्त आहे. या फोनमध्ये 3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टकोर प्रोसेसरसह 5नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ देण्यात आला आहे. हा क्वॉलकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप प्रोसेसर आहे, ज्याला एड्रेनो 660 जीपीयूची जोड देण्यात आली आहे. हा आयकू फोन अँड्रॉइड 11 आधारित ओरिजन ओएसवर चालतो.
iQOO 8 Pro मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50MP Sony IMX766V मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 48MP चा Sony IMX598 अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 16MP ची पोर्टरेट लेन्स मिळते. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. आयकू 8 प्रो स्मार्टफोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी 120वॉट अल्ट्राफास्ट फ्लॅश चार्जिंग आणि 50वॉट वायरलेस फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO 8 Pro ची किंमत
8GB रॅम + 256GB स्टोरेज: 4999 युआन (सुमारे 57,300 रुपये)
12GB रॅम + 256GB स्टोरेज: 5499 युआन (सुमारे 63,000 रुपये)
12GB रॅम + 512GB स्टोरेज: 5999 युआन (सुमारे 68,800 रुपये)
आयकू 8 प्रो चीनमध्ये 26 ऑगस्ट खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.