iQOO नं भारतात आपली फ्लॅगशिप iQOO 9 सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये iQOO 9 Pro, iQOO 9 आणि iQOO 9 SE असे तीन मॉडेल आले आहेत. या लेखात आपण यातील सर्वात प्रीमियम iQOO 9 Pro स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत. जो Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 120W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स
iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2K रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा सर्वात वेगवान चिपसेट Snapdragon 8 Gen 1 मिळतो. सोबत 12GB पर्यंत एन्हान्सड LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसाठी 18 बँड मिळतात.
फोटोग्राफीसाठी iQOO 9 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, गिम्बल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. सोबत 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2.5x झूमसह 16 मेगापिक्सलचा पोर्टेट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 4700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO 9 Pro ची किंमत
iQOO 9 Pro स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 64,990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 69,990 रुपये मोजावे लागतील. हा फोन 23 फेब्रुवारीपासून विकत घेता येईल.
हे देखील वाचा: