iQOO नं भारतीय बाजारात जम बसवण्यास सुरुवात केली आहे. गेमिंग स्मार्टफोन सादर करून मोबाईल गेमर्समध्ये कंपनीची लोकप्रियता वाढली आहे. आता कंपनीच्या iQOO 9 सीरीज अंतगर्त नवीन iQOO 9T नावाचा हँडसेट सादर केला जाणार आहे. ताज्या लीकनुसार हा फोन BIS सर्टिफिकेशनवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांच्या भेटीला आणखी एक फ्लॅगशिप स्मार्टफोन येणार असं वाटतं आहे.
91mobiles च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, iQOO 9T फोन मॉडेल नंबर I2201 सह BIS सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा फोन 12GB पर्यंत RAM आणि दमदार Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येईल. हा हँडसेट जुलैमध्ये सादर केला जाऊ शकतो.
iQOO 9T चे संभाव्य स्पेसिफिकेशन
मीडिया रिपोर्टनुसार, आयकू 9टी स्मार्टफोन 6.78 इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच फोनमध्ये Qualcomm चा नवीन फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 असेल. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात येऊ शकतो. बेस मॉडेल 8GB RAM व 128GB स्टोरेजसह तर टॉप मॉडेल 12GB RAM व 256GB स्टोरेजसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग मिळू शकते. तसेच फोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल.