ऑनलाईन गेम्सच्या स्पर्धा Esports म्हणून ओळखल्या जातात. ही इंडस्ट्री भारतात जम बसवत आहे, त्यामुळे अनेक ऑनलाइन गेम देशात येत आहेत. तसेच टेक ब्रँड्स देखील या स्पर्धांना प्रोत्साहन देत आहेत. आता Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने Krafton सह मिळून भारतात BGMI tournament ची घोषणा केली आहे. BattleGround Mobile India (BGMI) हे प्रसिद्ध पबजीचं भारतीय व्हर्जन आहे. विशेष म्हणजे ही BGMI ची देशातील सर्वात मोठी स्पर्धा आहे.
या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर संघ नोंदणी करतील अशी अपेक्षा आहे. कारण या स्पर्धेचे बक्षीस देखील एक कोटी रुपये आहे. देशात आयोजित करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोहित BGMI ई-स्पोर्ट्स टूर्नामेंट आहे. आयक्यूने अजूनतरी या स्पर्धेच्या तारखेची घोषणा केली नाही. परंतु नोंदणी फॉर्म मात्र ऑनलाईन पब्लिश केला आहे. या टूर्नामेंटचे थेट प्रक्षेपण iQOO Esports यूट्यूब गेमिंग चॅनेलवरून करण्यात येईल.
देशातील गेमर्सना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ईस्पोर्टस कॉम्यूनिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरेल, असे iQOO India चे चिप मार्केटिंग ऑफिसर गगन अरोडा यांनी म्हटले आहे.
iQOO Battlegrounds Mobile India Series रजिस्ट्रेशन
iQOO Battlegrounds Mobile India सीरीजमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या टीमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. क्वालीफायर मॅच 1024 टीम मध्ये होतील, त्यातून जिंकणारे संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. iQOO Battlegrounds Mobile India गेमिंग टूर्नामेंट सहभागी होण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता. : https://esports-battlegroundsmobileindia.com/register/