iQOO मिड रेंज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ओळखली जाते. परंतु विवोचा हा सब-ब्रँड आता आपला पोर्टफोलियो वाढवणार आहे. कारण कंपनी सॅमसंग, शाओमीप्रमाणे फ्यूचरिस्टिक फोल्डेबल, रोलेबल आणि स्लाइडर डिस्प्ले असलेले स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनीने चीनच्या ट्रेडमार्क साइटवर तीन स्मार्टफोन iQOO Roll, iQOO Fold, आणि iQOO Slide लिस्ट केले आहेत. iQOO चे हे तिन्ही स्मार्टफोन प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माने सर्वप्रथम स्पॉट केले आहेत.
iQOO च्या या तिन्ही स्मार्टफोनची डिजाइन समोर आली नाही. परंतु, यांच्या नावावरून अंदाज लावता येतो कि, कंपनी लवकरच रोलेबल, स्लाइडिंग आणि फोल्डेबल फोन लाँच करेल. या कामात कंपनीला वीवोची मदत होईल, हे निश्चित. सध्यातरी iQOO च्या आगामी स्मार्टफोनबाबत जास्त माहिती उपलब्ध झाली नाही.
iQOO Z3 झाला भारतात लाँच
iQOO Z3 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.58 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले पॅनल दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा iQOO फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसरसह येतो. या फोनमधील 5 स्थरीय कूलिंग सिस्टम फोनचे तापमान 10 डिग्री सेल्सियसने कमी करते, असा दावा कंपनीने केला आहे.
iQOO Z3 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड–अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फेस अनलॉक सोबतच या फोनमध्ये साइड–माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे जो पावर बटणमध्ये एम्बेड केला गेला आहे. iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आहे, जी 55W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.