iQOO चीनमध्ये 20 डिसेंबरला दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. याआधी फक्त iQOO Neo 5s स्मार्टफोनची माहिती कंपनीनं दिली होती. परंतु आता पुढील आठवड्यात कंपनीचा अजून एक फोन iQOO Neo 5 SE नावानं सादर केला जाईल, अशी माहिती आली आहे. iQOO नं एक व्हिडीओ शेयर करून Neo 5 SE स्मार्टफोन टीज केला आहे.
कंपनीनं शेयर केलेल्या व्हिडीओमधून iQOO Neo 5 SE च्या कलर व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन व्हाईट, डार्क ब्लू आणि ब्लू ग्रेडिएंट कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. तसेच यात पंच होल डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याची माहिती देखील टीज करण्यात आली आहे.
iQOO Neo 5 SE
iQOO Neo 5 SE स्मार्टफोनला Snapdragon 778G प्रोसेसरची ताकद देण्यात येईल. तसेच यात 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
iQOO Neo 5s
iQOO Neo 5s देखील पुढील आठवड्यात येतोय. यात 6.56-इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. तसेच यात Snapdragon 888 हा फ्लॅगशिप प्रोसेसर मिळू शकतो. सोबत 8GB RAM, आणि 128GB इंटरनल स्टोरेज असेल. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येईल. तसेच यात फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंगसह मिळेल.
हे देखील वाचा:
स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत
iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत