सप्टेंबरच्या अखेरीस आयक्यूने भारतात iQOO Z5 लाँच केला होता. हा फोन 20Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेरा Snapdragon 778G चिपसेट, 5000mAh बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. आता कंपनी iQOO Neo सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन लाँच करू शतके. याची माहिती एका टिप्सटरने दिली आहे.
एका चिनी टिपस्टरने आयक्यूच्या आगामी डिवाइसेजच्या नावाची माहिती दिली आहे. परंतु हे फोन कधी लाँच होतील हे मात्र सांगण्यात आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही फोन iQOO Neo 5s आणि iQOO Neo 6 SE नावाने सादर केले जातील. अन्य मीडिया रिपोर्ट्सनुसार या फोन्सची नावे iQOO Neo 6 आणि iQOO Neo 6 Lite असू शकतात, असे सांगण्यात आले आहे.
iQOO Neo 5s
Digital Chat Station नुसार, iQOO Neo 5s मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला OLED डिस्प्ले देण्यात येईल. जो पंच-होल डिजाईनसह सादर केला जिळ. या फोनमध्ये Qualcomm चा फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 888 चिपसेट आणि Adreno 660 GPU सह सादर केला जाईल. पॉवर बॅकअपसही यातील 4,500mAh ची बॅटरी 66W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.
या iQOO स्मार्टफोनमध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो Sony IMX598 सेन्सर असेल. सेन्सर OIS अर्थात ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशनला सपोर्ट करेल. हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा स्मार्टफोन 12GB पर्यंतच्या RAM आणि 256GB पर्यंतच्या इन-बिल्ट स्टोरेजसह सादर केला जाईल.
iQOO Neo 6 SE
iQOO Neo 6 SE मध्ये कंपनी Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरचा वापर करेल. या फोनमध्ये पण 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळू शकतो. रिपोर्टनुसार, हा Vivo V2157A मॉडेल नंबरसह चीनी सर्टिफिकेशन साइट 3C वर लिस्ट झालेला डिवाइस असू शकतो. फोनच्या अन्य फीचर्सची माहिती मात्र अजून मिळालेली नाही.