iQOO नं आपल्या आगामी iQOO Neo 6 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 30 मेला भारतात सादर केला जाईल. iQOO Neo 6 स्मार्टफोन याआधी कंपनीनं चीनमध्ये काही दिवसांपूर्वी सादर केला आहे. त्यामुळे या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीपासून उपलब्ध झाली आहे.
किंमत आणि उपलब्धता
iQOO Neo 6 स्मार्टफोन भारतात लाँच झाल्यानंतर याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या डिवाइसची भारतात किंमत 29 ते 31 हजार रुपयांच्या आत ठेवली जाऊ शकतो. याची विक्री जूनमध्ये सुरु होऊ शकते. चीनमध्ये हा हँडसेट 26 हजार रुपयांच्या आसपास सादर करण्यात आला होता.
iQOO Neo 6 SEचे स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा OIS ला सपोर्टसह मिळतो. सोबत 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. यात 16MP चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो जुन्या जेनरेशनचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. सोबत 12GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. सह सादर केला गेला आहे. आयकूचा हा अँड्रॉइड 12 स्मार्टफोन OriginOS Ocean वर चालतो. यातील लिक्विड कूलिंग सिस्टम हेवी परफॉर्मन्सनंतर देखील फोन थंड ठेवते.
iQOO Neo 6 SE स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात X-अॅक्सिस लीनियर व्हायब्रेशन मोटर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.2, NFC, 5G, 4G LTE आणि Wi-Fi मिळतो.