iQOO ने भारतात आपल्या नव्या सीरिजची सुरुवात केली आहे. कंपनीनं Neo सीरीजमध्ये iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Snapdragon 870 5G प्रोसेसर, 80W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. iQOO Neo 6 स्मार्टफोन गेमिंग फोन म्हणून कंपनीनं सादर केला आहे, यात खास Cascade Cooling System देण्यात आली आहे.
iQOO Neo 6 स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट 1200Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा OIS ला सपोर्टसह मिळतो. सोबत 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. यात 16MP चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो जुन्या जेनरेशनचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. सोबत 12GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळतो. आयकूचा हा अँड्रॉइड 12 स्मार्टफोन फनटच ओएस 12 वर चालतो. यातील लिक्विड कूलिंग सिस्टम हेवी परफॉर्मन्सनंतर देखील फोन थंड ठेवते.
iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात X-अॅक्सिस लीनियर व्हायब्रेशन मोटर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.2, NFC, 5G, 4G LTE आणि Wi-Fi मिळतो.
iQOO Neo 6 ची किंमत
iQOO Neo 6 स्मार्टफोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. 12GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 33,999 रुपयांच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. कंपनीनं डार्क नोवा आणि सायबर रेज असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. हा फोन आजच अॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. ICICI बँकेच्या कार्ड धारकांना 3000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या फोनवर कंपनी दोन वर्षांची वारंटी देत आहे.