Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने भारतात iQOO Z3 5G नावाचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दमदार Qualcomm Snapdragon 768G चिपसेट,400mAh बॅटरी आणि 55W फ्लॅश चार्जसह लाँच केला आहे. Snapdragon 768G सह लाँच झालेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.
iQOO Z3 5G चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Z3 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.58 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले पॅनल दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा iQOO फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसरसह येतो. या फोनमधील 5 स्थरीय कूलिंग सिस्टम फोनचे तापमान 10 डिग्री सेल्सियसने कमी करते, असा दावा कंपनीने केला आहे.
iQOO Z3 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड–अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फेस अनलॉक सोबतच या फोनमध्ये साइड–माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे जो पावर बटणमध्ये एम्बेड केला गेला आहे. iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आहे, जी 55W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.
iQOO Z3 5G ची किंमत
iQOO Z3 5G स्मार्टफोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,990 रुपये, 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 20,990 रुपये आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज 22,990 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. या स्मार्टफोनची विक्री अमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवर आज दुपारी 1 वाजता सुरु झाली आहे.
iQOO Z3 5G स्मार्टफोनसोबत लाँच ऑफर देखील मिळत आहे. या ऑफरअंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांचा कॅशबॅक डिस्काउंट आणि 1000 रुपयांचा डिस्काउंट अमेझॉन कुपनच्या माध्यमातून मिळत आहे. तसेच, कंपनीने 7 दिवस फोन वापरल्यानंतर रिर्टन करण्याची ऑफर दिली आहे.