Vivo च्या सब-ब्रँड iQoo ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी iQoo Z3 5G भारतात लाँच करणार आहे. हा फोन 8 जून रोजी भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. 8 तारखेला एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन जगासमोर येईल. (iQOO Z3 5G price will start from 20,990 Rs according to leaks)
iQoo Z3 5G स्मार्टफोनमध्ये आठ कोर असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 758G प्रोसेसर आणि 55W फास्ट चार्जिंग असेल. या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा असेल, अशी माहितीअशी माहिती आतापर्यंत समोर आली आहे.
आता एका टिप्सटरने iQoo Z3 5G ची भारतातील किंमत लीक केली आहे. GadgetsData ने दिलेल्या माहितीनुसार, iQoo Z3 5G भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. यात 6GB रॅम +128GB स्टोरेज, 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज असे व्हेरिएंट असतील. यातील सर्वात छोट्या व्हेरिएंटची किंमत 20,990 रुपये असू शकते तर इतर दोन मॉडेल्स क्रमशः 21,990 आणि Rs 23,990 रुपयांमध्ये उपलब्ध होतील.
iQOO Z3 5G चे स्पेसिफिकेशन्स
हा फोन दुसऱ्या देशांमध्ये लॉन्च झाला आहे त्यामुळे iQoo Z3 5G चे स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत. फोनमध्ये 6.5 इंचाचा आयपीएस फुलएचडी एलसीडी डिस्प्ले आहे. फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन एंडरॉयड 11 सह लाँच झाला आहे. तसेच, प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 768जी चिपसेट देण्यात आला आहे.
अॅमेझॉनवरून समजले आहे कि फोनमध्ये 8GB रॅम सोबतच 3GB एक्सटेंडेड रॅम दिला जाईल. फोटोग्राफीसाठी iQOO Z3 5G फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस उपलब्ध आहे. तर पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 55वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.