शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

जबरदस्त iQOO Z5 Cyber Grid Edition आला भारतीयांच्या भेटीला; फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि Snapdragon 778G 5G प्रोसेसर  

By सिद्धेश जाधव | Published: November 15, 2021 3:04 PM

iQOO Z5 Price In India: iQOO Z5 Cyber Grid Edition स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलेल्या मॉडेलची किंमत 23,990 रुपये आहे.

iQOO Z5 Price In India: विवोच्या सब-ब्रँड iQOO ने भारतात iQOO Z5 स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट लाँच केला आहे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीने एक स्मार्टफोन भारतात सादर केला होता, त्याचा नवीन व्हेरिएंट iQOO Z5 Cyber Grid Edition नावाने सादर केला आहे. फीचर्स आणि स्पेक्स सारखेच असले तरी आता iQOO Z5 स्मार्टफोनच्या मिस्टिक स्पेस आणि आर्टिक डॉन कलरसह अजून एका ऑप्शन उपलब्ध झाला आहे.  

iQOO Z5 Cyber Grid Edition ची किंमत 

iQOO Z5 Cyber Grid Edition स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेलेल्या मॉडेलची किंमत 23,990 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 26,990 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. लाँच ऑफर अंतगर्त 8GB व्हेरिएंटवर अ‍ॅमेझॉवर 1,500 रुपयांचा कुपन डिस्काउंट मिळेल. त्यामुळे या व्हेरिएंटची किंमत 22,490 रुपये होईल.  

iQOO Z5 Cyber Grid Edition चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Z5 Cyber Grid Edition मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. हा पंच होत डिजाईनसह सादर करण्यात आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो, जे गेमिंगसाठी खूप उपयुक्त ठरतात. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC वर चालतो, तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 670 GPU देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएसवर चालतो.   

या फोनमध्ये 12GB पर्यंतचा वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. iQOO Z5 Cyber Grid Edition मध्ये 4GB एक्सटेंडेड रॅम, VC लिक्विड कूलिंग सिस्टम, सराऊंड साऊंडसह ड्युअल स्पिकर आणि 4D गेम व्हायब्रेशनसह लिनियर मोटार देण्यात आली आहे.सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.    

iQOO Z5 Cyber Grid Edition मधील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL GW3 मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळते, ही बॅटरी 44W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करेल.    

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान