iQOO इंडियाने आपल्या नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन iQOO Z5 नावाने भारतात सादर केला जाईल. कंपनीने आपल्या सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली आहे. तत्पूर्वी हा फोन 23 सप्टेंबरला चीनमध्ये लाँच केला जाईल. कंपनीने कोणतीही अचूक तारीख सांगितली नाही परंतु त्यांनतर काही दिवसांत हा भारतीय बाजारात दाखल होईल.
iQOO Z5 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार आयक्यू झेड5 स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो, हे एक एलसीडी पॅनल असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. यात वेगवान LPDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजी मिळू शकते. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी 55वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी आयक्यू झेड5 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीक्सनुसार या कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर दिला जाईल. रियर सेटअपच्या इतर सेन्सरची माहिती मिळाली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नवीन आयक्यू फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे लीक स्पेसिफिकेशन्स आहेत त्यामुळे जोपर्यंत फोन भारतात दाखल होत नाहीत तोपर्यंत यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.