विवोच्या सब-ब्रँड आयक्यूच्या आगामी iQOO Z5x स्मार्टफोनची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार हा फोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता या बातमीला दुजोरा देत कंपनीने या फोनच्या लाँचची तारीख सांगितली आहे. iQOOने अधिकृतपणे iQOO Z5x 5G Phone 20 ऑक्टोबरला लाँच केला जाईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
iQOO Z5x चे स्पेसिफिकेशन
iQOO Z5x स्मार्टफोन 5000mAh बॅटरीची 44W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 2MP चा दुसरा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मदत करेल.
हा फोन MediaTek च्या Dimensity 900 प्रोसेसरसह बाजारात येईल. हा एक 6nm फॅब्रिकेशनवर बनलेला 5G प्रोसेसर आहे. या प्रोसेसरला Arm Mali-G68 जीपीयूची जोड दिली जाऊ शकते. कंपनी हा डिवाइस 6.58 इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले सह सादर करू शकते. हा एक 120Hz रिफ्रेश रेट असलेला Super AMOLED डिस्प्ले असू शकतो. iQOO Z5x चे इतर फीचर्स पाहता, यात तुम्हाला साइड माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर मिळू शकतो. तसेच हेडफोन जॅक देखील देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि ऑरेंज अशा दोन रंगात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे कंपनीने सांगितले आहे.