काही दिवसांपूर्वी iQOO भारतात iQOO Z5 स्मार्टफोन सादर केला होता. आता या लाईनअपमधील नवीन स्मार्टफोन iQOO Z5x 5G Phone कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे. हा मिडरेंजमध्ये सादर करण्यात आलेला नवीन डिवाइस आहे. ज्यात MediaTek Dimensity 900 प्रोसेसर, 50MP रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
iQOO Z5x स्पेसिफिकेशन्स
iQOO Z5x स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा LCD पॅनल देण्यात आला आहे. जो Full HD+ रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Dimensity 900 प्रोसेसरच्या प्रोसेसिंग पॉवरवर चालतो. यात 8GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज कंपनीने दिली आहे. फोन Android 11 आधारित iQOO UI वर चालतो.
डिवाइसमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच बॅक पॅनलवर 50MP प्रायमरी सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एलईडी फ्लॅशसह 2MP चा सेकंडरी सेन्सर मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये 5G, WiFi 6, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी-टाइप सी, 3.5mm ऑडियो जॅक होल असे पर्याय मिळतात. तर सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. iQOO Z5x मध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 44Wकी फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
iQOO Z5x ची किंमत
- 6GB RAM + 128GB स्टोरेज: 1599 युआन (अंदाजे ₹ 18,800)
- 8GB RAM + 128GB स्टोरेज: 1699 युआन (अंदाजे ₹ 20,000)
- 8GB RAM + 256GB स्टोरेज: 1899 युआन (अंदाजे ₹ 22,400)
हा फोन ब्लॅक, फॉग सी वाइट आणि सँडस्टोन ऑरेंज अशा तीन कलरमध्ये चीनमध्ये उपलब्ध होईल. कंपनीने या फोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली नाही, परंतु हा डिवाइस भारतात दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.