गेल्या महिन्यात iQOO चा नवीन स्मार्टफोन iQOO Z5 कंपनीने आधी चीनमध्ये आणि त्यानंतर भारतात सादर केला होता. आता या स्मार्टफोनच्या नव्या व्हर्जन iQOO Z5x ची माहिती समोर आली आहे. iQOO Z5x स्मार्टफोन गेल्या आठवड्यात चिनी ई-कॉमर्स साईट JD.com आणि IMEI डेटाबेसवर लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमधून Vivo चा मॉडेल नंबर V2131A असलेला स्मार्टफोन मार्केटमध्ये iQOO Z5x नावाने सादर केला जाईल, असे समजले आहे.
iQOO Z5x चे स्पेसिफिकेशन्स
चिनी टिपस्टरनुसार iQOO Z5x स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 900 चिपसेटसह सादर केला जाईल. हा फोन 44W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल. V2131A मॉडेल नंबर असलेला हा स्मार्टफोन Google Play Console वर देखील D900 प्रोसेसरसह लिस्ट करण्यात आला होता. हा फोन iQOO Z5 चा छोटा व्हर्जन असू शकतो, जो चीनमध्ये सादर झाल्यानंतर भारतात उतरवला जाईल.
लिस्टिंगनुसार iQOO Z5x स्मार्टफोन पंच होल कटआउटसह बाजारात येईल. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाईल. iQOO Z5 स्मार्टफोन प्रमाणे या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. आगामी iQOO Z5x स्मार्टफोन 8GB रॅम आणि Android 11 OS सह सादर केला जाईल. 3C सर्टिफिकेशननुसार हा फोन 5G केनेक्टिव्हिटीसह सादर केला जाईल.