iQoo ब्रँड अंतर्गत लवकरच भारतात नवीन स्मार्टफोन iQoo Z6 5G सादर केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनची मायक्रो साईट लाईव्ह करण्यात आली आहे. हा डिवाइस सप्टेंबर, 2021 मध्ये लाँच झालेल्या iQOO Z5 5G ची जागा घेईल आणि मिड रेंज सेगमेंटमध्ये हा फोन सादर केला जाईल. लीक आणि रिपोर्ट्समधून लाँच होण्याआधीच या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
iQoo Z6 5G चा भारतीय लाँच
टिपस्टर Abhishek Yadav नं दिलेल्या माहितीनुसार, हा फोन याच आठवड्यात भारतीयांच्या भेटीला येईल. त्याने केलेल्या ट्विटमध्ये हा फोन 16 मार्च, 2022 ला भारत येईल असं सांगितलं आहे. परंतु ही अधिकृत तारीख नाही.
संभाव्य स्पेसिफिकेशन
मायक्रो साईटच्या लिस्टिंगनुसार, हा फोन Vivo T1 सारखा दिसतो. या 5G स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅश दिसत आहे. Z सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन Full HD+ रिजोल्यूशनसह येईल. याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच यात ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळू शकतो, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्मानं दिली आहे.
हे देखील वाचा: