नवी दिल्ली - आयआरसीटीसी (IRCTC) ग्राहकांना रेल्वेशी संबंधित सेवा पुरवण्यासोबतच इतरही अनेक सेवा पुरवते. यामध्ये एअर तिकिट, बस तिकिट आदिंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आयआरसीटीसीचे मोबाईल पेमेंट अॅप्लीकेशनही आहे. या अॅप्लीकेशनद्वारे तुम्ही शॉपिंग देखील करू शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता आणि एकमेकांना पैसेही पाठवूही शकता. अन्य अॅप्लीकेशनच्या तुलनेत या अॅप्लीकेशनवर अधिक ऑफर्स मिळतात. नुकतेच आयआरसीटीसीने एक ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्ही 2 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. कसं ते जाणून घ्या...
अॅप्लीकेशन कोणतं आहे?
आयआरसीटीसीचे हे पे-मोबाईल अॅप्लीकेशन असून आय-मुद्रा असं त्याचं नाव आहे. या अॅप्लीकेशनमुळे फक्त सुलभ आणि सुरक्षित व्यवहारच होत नाही तर वापरकर्त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीसह मित्र आणि कुटुंबियांना पैसे पाठविण्याचा पर्याय देखील मिळतो. आय-मुद्रा अकाऊंटसोबत डिजिटल वॉलेट आणि प्रीपेड कार्डही मिळते.
काय आहे ऑफर?
आयआरसीटीसी आय-मुद्रा अॅपच्या व्हिजा आणि रुपे कार्डद्वारे केलेल्या ट्रान्झॅक्शनवर 2 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर देत आहे. आय-मुद्रा अॅपच्या व्हिसा किंवा रुपे कार्डवर तुम्ही 5000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यास तुम्हाला 2000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. आयआरसीटीसीकडून मिळणाऱ्या या विशेष ऑफरचा तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्ही आय-मुद्रा अॅपचा वापर करू शकता.
आय-मुद्रा अन्य पेमेंट अॅप्लीकेशनसारखेच आहे. ज्यात तुम्ही पेमेंट आणि शॉपिंग करू शकता. यासोबत एक फिजिकल कार्डही मिळते, ज्याद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. यासह तुम्ही डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून या अॅप्लीकेशनच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. या वॉलेटमधून तुम्ही सहजरित्या तिकिट बुक करू शकता आणि पेमेंटही करू शकता. हे अॅप्लीकेशन तुम्ही प्ले स्टोरच्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता.
आयआरसीटीसीने फेडरल बँकेच्या सहकार्याने हे कार्ड लाँच केलं आहे. या कार्डमध्ये तुम्ही डेबिट कार्ड, युपीआय किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरू शकता. आयमुद्रा अकाऊंटसोबत डिजिटल वॉलेट आणि प्रीपेड कार्ड येत असल्याने या सुविधेमार्फत एटीएममधून पैसे काढू शकता. मात्र यासाठी आईआरसीटीसी मुद्रावर साईन-अप करणे आवश्यक असून युजरला फिजिकल किंवा व्हर्चुअल कार्ड जनरेट करावे लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.