नवी दिल्ली-
जर तुम्हाला अचानक ट्रेनने प्रवास करायचा असेल आणि तिकीट मिळत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही आपण अशाच काही पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यातून तुम्ही Tatkal Rail Ticket Booking करताना कधीच अपयशी ठरणार नाही. पण तत्काळ तिकीट बुकिंग करताना तुमच्या एका चुकीमुळे कन्फर्म रेल्वे तिकीट बुकिंग मिळू शकणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही स्टेप्स फॉलो करणं फार महत्वाचं आहे-
IRCTC Ticket Booking Option मध्ये रेल्वेकडून सातत्यानं अपडेट करण्यात येत असतात. आता नव्या बदलानुसार तुम्हाला तिकीट प्राप्त करणं खूप सोपं झालं आहे. AC Tatkal Ticket Booking सकाळी १० वाजता सुरू होते. तर Sleeper Class Booking सकाळी ११ वाजता सुरू होते. तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट ठरते. जर तुम्ही अचूक वेळी तिकीट बुकिंग करत असाल तर तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि सहज तिकीट देखील प्राप्त होईल.
Tatkal Ticket Booking करताना तुम्ही प्रवासाची यादी आधीच तयार करुन ठेवावी. प्रवासाची यादी तयार करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला IRCTC वेबसाइटवर प्रवाशांचे तपशील पुन्हा-पुन्हा भरावे लागत नाहीत. यातून वेळेची बचत होते. एकदा प्रवासाची यादी तयार झाली की, तुम्ही ती सेव्ह करू शकता आणि बुकिंग सुरू झाल्यावर तुम्हाला फक्त कन्फर्म करण्यासाठी जावं लागेल आणि प्रवासाची यादी निवडल्यानंतर, सर्व प्रवाशांचे तपशील आपोआप नोंद केले जातील.
जेव्हा तुम्ही तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला प्रवाशांचे तपशील पुन्हा एंटर करण्याची गरज नसते. तुम्ही प्रवासाची यादी निवडताच, सर्व प्रवाशांचे तपशील आपोआप भरले जातील. शेवटी पेमेंटचा पर्याय तुमच्या समोर येईल. पेमेंट पर्याय म्हणजे तुम्हाला फक्त पेमेंट करावे लागेल. पेमेंट करण्यासाठी येथे तुम्ही UPI, क्रेडिट/डेबिट कार्ड वापरू शकता.