इंटरनेटच्या आजच्या जगात लोकांचा ऑनलाइन मागोवा घेणे ही काही मोठी गोष्ट नाही. बाजारात असे अनेक ॲप्स आहेत, ज्यांच्या मदतीने लोक परवानगी घेऊन एकमेकांना ट्रॅक करतात. तथापि, परवानगी न घेता डेटा चोरणाऱ्या हॅकर्सचाही सध्या सुळसुळाट झालाय. आज आम्ही तुम्हाला काही यूएसएसडी कोड सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा फोन ट्रॅक होत नाहीये ना, याबाबत तुम्ही जाणून घेऊ शकता.
कोड *#21#तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये हा कोड डायल करून, तुमचे मेसेज, कॉल किंवा इतर कोणताही डेटा इतरत्र वळवला जात आहे की नाही, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. जर तुमचे कॉल कुठेही वळवले जात असतील तर या कोडच्या मदतीने तुम्हाला नंबरसह संपूर्ण तपशील मिळेल. तुमचा कॉल कोणत्या नंबरवर डायव्हर्ट झाला आहे, हेदेखील कळेल.
कोड *#62#तुमचा फोन लागत नाही, नो सर्व्हिस किंवा नो अन्सर एरर येत असल्याची तक्रार अनेकदा केली जाते. अशा वेळी तुम्ही हा कोड फोनमध्ये डायल करू शकता. या कोडच्या मदतीने तुमचा फोन दुसऱ्या नंबरवर रिडायरेक्ट झाला आहे की नाही, हे जाणून घेऊ शकता.
कोड ##4636##या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनची संपूर्ण माहिती मिळवू शकता. फोनमध्ये कोणती बॅटरी आहे, वाय-फाय कनेक्शन चाचणी, फोन मॉडेल, रॅम अशी सर्व उपयोगी माहिती मिळेल.
कोड *#06#या कोडच्या मदतीने तुम्ही फोनचा आयएमईआय नंबर शोधू शकता. या क्रमांकाद्वारे, तुम्ही सीईआयआरच्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या हरवलेल्या स्मार्टफोनचे लोकेशन पाहू शकता. तुमचा फोन बंद असला किंवा सिम बदलले तरी आयएमईआयद्वारे तो ट्रॅक करता येणे शक्य आहे.
कोड ##002#या कोडच्या मदतीने तुमच्या फोनवरील सर्व फॉरवर्डिंग बंद करू शकता. म्हणजे तुमचा कॉल डायव्हर्ट होत आहे, अशी शंका असल्यास तुम्ही हा कोड डायल करू शकता.