तुमचा मोबाईल हॅक झाल्यावर अनेक बदल बघायला मिळतात. हे बदल फोन हॅक झाल्याचे सूचित करणारे असतात; पण आपल्यातील बहुतांशजण त्याकडे क्षुल्लक गोष्ट म्हणून दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चातापाची वेळ येते.
साधारणपणे तुम्ही जे इंटरनेटवर सर्च करता त्याच्याशी संबंधितच पॉपअप तुम्हाला आपोआप दिसतात. पण, एखादा स्मार्टफोन हॅक केला जातो, तेव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये एक्स-रेट केलेले पॉपअप दिसतात, ज्याच्याशी वापरकर्त्याचे कोणतेही कनेक्शन नसते. म्हणजे तुम्ही त्याच्याशी संबंधित काहीही सर्च केलेले नसते. जर तुमच्या फोनमध्ये असेच पॉपअप येत असतील आणि तुम्ही ती गोष्ट कधीही सर्च केलेली नसेल तर सतर्क व्हा.
'ही' देखील चिन्हे
- वापर कमी करूनही जर इंटरनेट डेटा वेगाने संपत असेल तर सावध व्हा.
- बॅटरी विनाकारण वेगाने संपत असल्यास सतर्क व्हा. सेटिंग्स तपासा आणि अँटिव्हायरस ॲप वापरा.
- नवीन स्मार्टफोनसुद्धा जेव्हा खूप स्लो होतो, तेव्हा सावध होण्याची गरज असते.
- तुम्ही स्मार्टफोनवरून कॉल करू शकत नसाल किंवा मेसेज पाठवू शकत नसाल तर हे डिव्हाइस हॅक झाल्याचे लक्षण आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"