सध्या सर्वच स्मार्टफोन Bluetooth सुविधा असतेच. अनेकदा युझर्स ब्लूटूथ डिस्कवरी मोडवर सोडून देतात. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनचं ब्लूटूथ कुणीही सर्च करू शकतं. त्यामुळे अशा गोष्टींवर हॅकर्सचं लक्ष असतंच. हॅकर्स या माध्यमातून तुमच्या डिवाइसचा डेटा अॅक्सेस करू शकतात. त्यामुळे प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या पातळीवर ही गोष्ट जास्तच अडचणीची ठरू शकते.
ब्लूटूथ तुम्ही ऑन ठेवलं आणि तुम्ही त्याचा उपयोग डिव्हाइस पेअरिंगसाठी करत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. यापासून बचावासाठी आधी जाणून घ्यावं लागेल की BlueBugging काय आहे की ज्यानं तुमचा मोबाइलचा कंट्रोल केला जाईल. BlueBugging सोबतच हॅकर्स Bluesnarfing आणि Bluejacking चाही वापर करुन मोबाइल यूझरचा डेटा अॅक्सेस केला जाऊ शकतो.
काय आहे BlueBuggingBlueBugging चा हल्ला जास्त धोकादायक मानला जातो. यात हॅकर्स यूझर्सच्या डिव्हाइसचा अॅक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ब्लूटूथ कनेक्शनची मदत घेतली जाते. कनेक्शनला अल्टर करत यूझरचा पासवर्ड आणि इतर डिटेल्स चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी हॅकरआधी यूझरच्या मोबाइलपर्यंत पोहोचतात आणि त्यात मालवेअर इन्स्टॉल करतात. यातून भविष्यातही यूझरच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला जाऊ शकतो. तसंच हॅकर यूझरचं फोनवरील संभाषण देखील ऐकू शकतो.