सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारात 5G Phones ची लाट आली आहे. याची सुरुवात यावर्षीच्या सुरुवातीपासून झाली आहे. 2021 च्या अखेरपर्यंत Smartphone निर्माण करणात्या कंपन्या तसेच Telecom कंपन्यांनी या लाटेला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे सामान्य ग्राहक देखील 5G Network ची उत्सुकतेने वाट बघत आहे. येणाऱ्या वेगवान भविष्यासाठी तयार होण्यासाठी अनेकांनी 5G Phone विकत घेतले आहेत. परंतु या फोन्समधील 5G फिचर आता तर निरुपयोगी आहे परंतु 2022 मध्ये देखील देशात 5G येणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.
5G नेटवर्क लांबणीवर
भारतात 5G लवकर येईल असे वाटत नाही. टेलिकॉम कंपन्यांना 5G चाचण्यांमध्ये हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे टेलीकॉम कंपन्यांनी भारत सरकारकडे 5G Trials पूर्ण करण्यासाठी अजून एक वर्षाची मुदत मागितली आहे. यात Reliance Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही प्रमुख भारतीय टेलिकॉम कंपन्यांचा समावेश आहे. म्हणजे आता देशात 5G ची एंट्री पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत तरी होणार नाही असे वाटत आहे. कारण चाचण्या यशस्वी झाल्यानंतर देखील संपूर्ण देशात 5G नेटवर्क पोहोचण्यास काही वर्ष लागू शकतात.
आता 5G Phone विकत घ्यावे का?
देशातीलप्रमुख स्मार्टफोन कंपन्या लागोपाठ 5G स्मार्टफोन्स सादर करत आहेत. कमी किंमतीत 5G फोन आणण्याच्या नादात कंपन्या स्मार्टफोन्समधील इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सशी तडजोड करत आहेत. 5G फोन आहे म्हणून तो 4G फोन पेक्षा वेगवान असेल असा समज करून घेऊ नका. या कंपन्या अगदी बजेट सेगमेंटमध्ये देखील 5G फोन लाँच करत आहेत. त्यात 5G चे कारण देऊन इतर कंपोनंट्समध्ये कॉस्ट कटिंग करत आहेत. असे 5G Phone भारतात 5G येण्याआधी जीव सोडू शकतात. त्यामुळे जो प्रीमियम 5G च्या नावाने घेतला जात आहे त्यात तुम्ही एक चांगला 4जी फोन विकत घेऊ शकता.