चिनी कंपनी आयटेलने पुन्हा एकदा 6,000 रुपयांच्या आत एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. याआधी देखील कंपनीने या एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये आपला दबदबा दाखवून दिला होता आणि त्याची दखल रिसर्च फर्म काउंटरपॉईंटने देखील घेतली होती. आता आयटेल आपल्या ‘ए’ नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने itel A26 स्मार्टफोन फक्त 5,999 रुपयांमध्ये सादर केला आहे.
itel A26 स्मार्टफोनमध्ये कंपनीने खास सोशल टर्बो फिचर दिला आहे. याच्या मदतीने व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्टेट्स सेव सारखे फंक्शन्स वापरता येतील. हा स्मार्टफोन विकत घेतल्यानंतर 100 दिवसांच्या आत स्क्रीन तुटल्यास, ती एकदा मोफत बदलून दिली जाईल. हा डिवाइस ग्रीन, लाईट पर्पल आणि डीप ब्लू अशा तीन ग्रेडियंट कलर्समध्ये उपलब्ध होईल.
itel A26 चे स्पेसिफिकेशन्स
आयटेल ए26 हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, त्यामुळे कंपनीने यात अँड्रॉइडच्या गो एडिशनचा वापर केला आहे. हा फोन 1.4गीगाहर्ट्ज स्पीड असलेल्या क्वॉड-कोर Unisoc SC9832e प्रोसेसरवर चालतो. यात वॉटरड्रॉप नॉचसह 5.7 इंचाचा एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेश्यो 19:9 इतका आहे.
हा डिवाइस 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. हा फोन 128GB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फिचरला सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम फोन आहे, तसेच यात डेडिकेटेड मेमरी कार्ड स्लॉट देखील मिळतो.
फोटोग्राफीसाठी itel A26 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 5 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि एक एआय प्लस वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या आयटेल फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. ए26 मध्ये 3020एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.