Cheapest Smartphone itel A48: कंपनीनं आपल्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सवर itel A48 वर ऑफरची घोषणा केली आहे. हा फोन 6,399 रुपयांमध्ये ऑगस्टमध्ये भारतात लाँच केला गेला होता. परंतु ऑफर अंतर्गत हा फोन फक्त 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी कंपनीनं Home Credit India Finance सोबत भागेदारी केली आहे.
itel A48 ची किंमत
itel A48 स्मार्टफोनची किंमत 6,399 रुपये आहे, परंतु कंपनीनं Home Credit India Finance सोबत भागेदारी करून एक ऑफर सादर केली आहे. त्यामुळं हा फोन फक्त 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही डाउन पेमेंटची रक्कम आहे. त्यानंतर ग्राहकांना उर्वरित रक्कम 625 रुपयांच्या 8 नो-कॉस्ट ईएमआयमध्ये द्यावी लागेल.
Itel A48 चे स्पेसिफिकेशन्स
Itel A48 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा एचडी+ डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हा आयपीएस पॅनल 1560x720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. 19.5:9 अस्पेक्ट रेशियोसह येणारा हा डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच डिजाईनसह बाजारात आला आहे. या फोनमधील क्वॉडकोर प्रोसेसरची माहिती कंपनीने सांगितलेली नाही. हा आयटेल फोन अँड्रॉइड 10 (गो एडिशन) वर चालतो. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.
Itel A48 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यात 5 मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे मिळतात. फोनच्या फ्रंटला देखील 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या ड्युअल सिम आयटेल फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी VoLTE/ ViLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी आयटेल ए48 मध्ये फेस अनलॉक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तसेच हा 3,000 एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.