आयटेलने भारतात आपला Itel A48 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक Android 10 (Go edition) वर चालणारा लो बजेट स्मार्टफोन आहे. हा फोन 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत 6,699 रुपये ठेवण्यात आली आहे. Itel A48 स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावरून Gradation Black, Gradation Green आणि Gradation Purple रंगात विकत घेता येईल. कंपनीने या स्मार्टफोनच्या खरेदीनंतर 100 दिवसांमध्ये वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत देण्यात येईल.
Itel A48 चे स्पेसिफिकेशन्स
Itel A48 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा एचडी+ डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हा आयपीएस पॅनल 1560x720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. 19.5:9 अस्पेक्ट रेशियोसह येणारा हा डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच डिजाईनसह बाजारात आला आहे. या फोनमधील क्वॉडकोर प्रोसेसरची माहिती कंपनीने सांगितलेली नाही. हा आयटेल फोन अँड्रॉइड 10 (गो एडिशन) वर चालतो. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.
Itel A48 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यात 5 मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे मिळतात. फोनच्या फ्रंटला देखील 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या ड्युअल सिम आयटेल फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी VoLTE/ ViLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी आयटेल ए48 मध्ये फेस अनलॉक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तसेच हा 3,000 एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.